ISRO Achievement

●●●●●●●●●●●●●●●●●●●
“कमाल केली आज इस्रोने”
●●●●●●●●●●●●●●●●●●●
चाल:-“आओ बच्चों तुम्हें दिखाएं,झांकी हिन्दुस्थान की”
♤♡♢♧♤♡♢♧♤♡♢♧

🇮🇳 उपग्रहांना आज सोडले शंभर आणिक चारांसी ।
कमाल केली आज “इस्रो”ने झेंडा रोवूनि अवकाशी ।।🇮🇳

🚩🚩वन्दे विज्ञानम्।वन्दे भारतम्।।🚩🚩

🇮🇳 अम्हींही होतो एके काळी, ‘विश्वगुरु’ या जगताचे
‘भारत’ म्हणजे ‘ज्ञानी रत’ जे,पुत्र सदोदित भरताचे
अविरत होती वाहत गंगा,ज्ञानाची विज्ञानाची
परंपरा ही भरद्वाजमुनि,कपिल,कणाद नि चरकाची

आर्यभट्ट,बोधायन,भास्कर खेळ खेळती गणिताशी ।
राज्ञी होती भारतमाता आणि तेधवा जगताची ।।1।।🇮🇳

🚩🚩वन्दे विज्ञानम्।वन्दे भारतम्।।🚩🚩

🇮🇳 कालचक्र पण फिरता आली,भाळी गुलामी परक्यांची
फकीर झाली भूमी सोने,हिरे,माणिक,मोत्यांची
स्वतंत्र झालो काय दुर्दशा,तेंव्हा अमुच्या देशाची
नाही सुईही बनत तेधवा एकही होती देशाची

राखेतूनि परि उभी राहूनि मुंगी उडाली आकाशी ।
मुंगी उडाली आकाशी अन् तिनेच गिळले सूर्यासी।।2।।🇮🇳

🚩🚩वन्दे विज्ञानम्।वन्दे भारतम्।।🚩🚩

🇮🇳 आम्हां देण्या तंत्रज्ञाना जगी कुणीही राजी नसे
पंखांमध्ये बळ असता मग,काय कुणाची गरज असे?
अम्हींच अमुचे ज्ञान निर्मूनि,विकास केला तंत्राचा
उपग्रहे अन् याने बनविली,घोष स्वदेशी मंत्राचा

मंगळ,चंद्रा यान पाठवूनि वेसण अमुची गगनासी।
कमाल केली आज “इस्रो”ने झेंडा रोवूनि अवकाशी ।।3।।🇮🇳

🚩🚩वन्दे विज्ञानम्।वन्दे भारतम्।।🚩🚩

🇮🇳 अंतराळशास्त्राचे अमुच्या थोर प्रणेते साराभाई
होमी भाभा,सतिश धवन अन् कलाम यांचे अनुयायी
‘आर्यभट्ट’,’भास्कर’,’रोहिणी’ ,’अॅपल’ सोडूनि आकाशी
‘अग्नि’,’पृथ्वी’,’नाग’ देवूनि सज्ज बनविले फौजेसी

वैज्ञानिक हे थोर आमुचे,नमन तयांच्या चरणाशी ।
कमाल केली आज “इस्रो”ने,झेंडा रोवूनि अवकाशी ।।4।।🇮🇳

🚩🚩वन्दे विज्ञानम्।वन्दे भारतम्।।🚩🚩

■■■■■■■■■■■■■■■■■■■■
*रचना:-डाॅ.सचिन जांभोरकर,
नागपूर.*
■■■■■■■■■■■■■■■■■■■■