प्रवास, प्रयास, विश्वास

माझ्या प्रिय आय.एस.ए., एन.सी.बी परिवारास माझा नमस्कार. मी डॉ. सुभाष आत्माराम श्रीराव आय.एस.ए., नागपूर शाखेचा स्थापनेचे 50 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल सर्व सदस्यांचे अभिनंदन करतो व माझ्या जीवनाचा प्रवास तुमच्या समोर सादर करतो. मला माझ्या विषयाचा तथा माझ्या व्यावसायीक संघटनेचा अतिशय अभिमान आहे. आज मी मागे वळून बघितले तर अख्खा प्रवास माझ्या डोळ्यासमोर दिसतो. तुम्हाला जर वाटत असेल की तो अगदिच सोपा व सरळ होता, तर तसे मात्र अजिबात नाही. माझा प्रवास कष्टाचा, मेहनतीचा व खडतळ जरी असला तरी तुमच्या सारख्या मित्र, मैत्रिणी व सहयोगींमुळे तो अंत्यत आनंदी झाला आहे.

माझा जन्म 3 जूलै 1946 ला झाला व माझे एम.बी.बी.एस. चे शिक्षण हे 1964 ते 1970 मध्ये पार पडले. 1976 मध्ये माझे एम.डी. एनिस्थिेसिया झाले. 1979 ते 2004 मी आय.जी.एम.सी. (IGMC) , नागपूर येथे कार्यरत होतो. त्या दरम्यान एकुण 35 विद्यार्थ्यांना मी गाईड केले. 1973 मध्ये जेंव्हा आपल्या संघटनेची स्थापना झाली तेंव्हा मी संस्थापक सदस्य होतो.

मी 1976 ला खाजगी प्रॅक्टीस सुरू केली व मातृसेवा संघ, महाल ला पण सुेवा देऊ लागलो. 1989 ते 1994 मी कार्यकारी परिषद, नागपूर विद्यापिठ म्हणुन कार्यरकत होतो. मी अनेक सर्जिकल कॅम्प्स मध्ये सहभागी झालो आहे. कधी-कधी दिवस-रात्र काम करत असतांना भूक व तहान पण विसरलो. त्याकाळी भुलतज्ञांची खाजगी प्रॅक्टीस अतिशय कठिण होती. O. T. मध्ये O2, OT मशिन्स सुद्धा नसायचे. भुलतज्ञांनीच आपल्या जबाबदारीवर केस करायची असायची. पण हळूहळू मी सर्जनस्ला यांचे महत्व पटवले व ते आमच्या मागण्या पूर्ण करू लागले. भूलतज्ञांना त्यांचा मान मिळवून देण्यासाठी माझ्या कष्टाचे फळ म्हणजे मला अनेक पुरस्कार देण्यात आले आहे. आता मी मात्र थोड दमान घेतो आहे. माझा जीवनाचा, शेताचा व प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. माझ्या आय.एस.ए. परिवारास या दिवशीच्या खूप खूप शुभेच्छा. असेच पुढे जा व आय.एस.ए.परिवार खुप वाढवा.

Proud to be an Anaesthesiologist!

By Dr. Subhash Shrirao
Founder Member ISA NCB
President, ISA-NCB [1984 – 85]
Hon. Secretary, ISA-NCB [1980 – 81]